Breaking News

एसटी कर्मचा-यांच्या पगारवाढीसाठी करार करण्यास तयार - दिवाकर रावते

पुणे, दि, 12, ऑक्टोबर - सातवा वेतन आयोग मिळावा हा एसटी कर्मचार्‍यांचा मुद्दा नसून त्यांना वेळेप्रमाणे पगार पाहिजे. पगारात वाढ व्हावी अशी कर्मचार्‍यांची इच्छा असून, आम्ही  स्वत: त्याबाबत करार करायला तयार आहोत. ज्या गोष्टी मिळणारच नाही अश्या मृगजळाच्या मागे कर्मचार्‍यांनी लागू नये. कर्मचारी हा महामंडळाचा आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या बाजूने क रार करायचा असल्याचे स्वत: न्यायालयाला आम्ही सांगितले असून येत्या 13 ऑक्टोबरला न्यायालयाने बोलावले आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली. 
पुण्यातील एका कार्यक्रमप्रसंगी ते पत्रकारांशी बोलताना होते. सातवा वेतन आयोग कोठेही लागू नाही. सातवा वेतन आयोग म्हणजे काय पाहिजे हे अद्याप कोणालाही सांगता आले नाही.  पगारवाढ व्हावी यासाठी कर्मचारी आतूर असून, आम्ही त्याबाबत करार करायला तयार आहे. एसटी अपघात आणि जुन्या गाड्यांबाबत त्यांना विचारले असता, या अधी एसटीच्या गाड्या  ह्या ऍलीम्युनियमच्या होत्या. आता लोखंडी एसटी बस बनवायला घेत आहे. त्याचे ट्रायल पुण्यातच झाले असून, केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर या एसटी बस खरेदी केल्या जाणार  असल्याची माहिती रावते यांनी दिली. सांस्कृतीक व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर कलाकार आणि विद्यार्थी नाराज असल्याचे रावते यांना विचरले असता, विद्यापीठाचा कारभार  बिघडलाय हे सर्वांनी मान्य केले. विद्यार्थ्यांचे पेपरच गायब झाले असतील तर त्यांना गुण मिळणार कसे. विद्यापीठे ही राज्यपालांच्या अधीपत्याखाली येतात त्यामुळे राज्यपाल योग्य ते निर्णय  घेतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
निवासी भागात फटाके विक्रीबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाबाबत मंत्र्यांना विचारले तर त्यांना कायद्याच्या संदर्भामध्येच बोलावे लागते. ज्यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदन हे मंत्री  म्हणून बोलतात त्यावेळी ते सरकार म्हणून बोलत असतात. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फटाकेंबाबत मांडलेली भूमिका ही शिवसेना पक्षाची आहे, हिंदूत्वाची भूमिक ा आहे. आमच्या मागचे मंत्रीपद काढल्यानंतर आमच्या सर्वांची हीच भूमिका असेल. - दिवाकर रावते, परिवहनमंत्री