Breaking News

वीज पडून जखमी झालेल्यांना प्रत्येकी चार हजारांची शासकीय मदत

बुलडाणा, दि. 13, ऑक्टोबर - तालुक्यातील जानोरी शिवारात 14 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेदरम्यान वीज पडून दोन महिला ठार तर चार महिला जखमी झाल्याची घटना  घडली होती. तर वीज पडून ठार झालेल्या महिलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची शासकीय मदत प्रशासनाकडून देण्यात आलेली असून यामध्ये जखमी झालेल्यांना  देखील प्रत्येकी चार हजार आठशे रुपयाची मदत देण्यात आली आहे. 
वीज पडून जखमी झालेल्या महिलांमध्ये कांताबाई जगन्नाथ ढोले, वंदना संतोष वानखडे तर निंबोळकर यांच्या शेता विज पडून जखमी झालेल्यांमध्ये रंजना आत्माराम डांगे व कमल  समाधान निंबोळकर यांचा समावेश आहे तर यामधील रंजना आत्माराम डांगे यांना 9 ऑक्टोबर रोजी तहसीलदार गणेश पवार यांच्याहस्ते चार हजार आठशे रुपयांचा धनादेश देण्यात  आला असून वीज पडून जखमी झालेल्या सर्व जखमींना अशाप्रकारची शासकीय मदत मिळणार आहे. यावेळी गोपाल बोरसे, प्रमोद टाले, गोपाल सोलनकर यांच्यासह जानोरी येथील  काही नागरीक उपस्थित होते.