Breaking News

चौघांना वाचवण्यास गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू

सोलापूर, दि. 13, ऑक्टोबर - सांगोला तालुक्यातील वाकीशिवणी येथे बंधार्‍यात पडलेल्या तरुणांना वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या परतीच्या  पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे सांगोला परिसरातील ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. यावेळी राम चव्हाण, मुन्नाकुमार, आनंद ऐवळे आणि व्यंकटेश पवार हे तरुण  पाण्यात पोहण्यासाठी उतरले. पण, ते बुडू लागल्याचे पाहून महादेव कांबळे, सदाशिव कांबळे आणि खाजू चव्हाण यांनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. मात्र, त्यांना  पाण्याच्या वेगाचा अंदाज आला नाही. पाण्यात तयार झालेल्या भोवर्‍यामुळे वाचवायला गेलेल्या तिघांचाही बुडून मृत्यू झाला.ही घटना समजताच गावकर्‍यांनी बुडू लागलेल्या चारांना  बाहेर काढले. मात्र, त्यांना वाचवायला गेलेल्या तिघांचे मृतदेहच हाती आल्याने गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगोला येथे नेण्यात  आले आहेत. तर, वाचलेल्या 4 तरुणांपैकी 2 जणां शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.