Breaking News

महापौर निवासाचे भूमिपूजन माझ्या कार्यकाळातच होणार - नितीन काळजे

पुणेे, दि. 06, ऑक्टोबर - गेल्या 25 वर्षांपासून रेंगाळत असलेला महापौर निवासाचा प्रश्‍न माझ्या कार्यकाळात मार्गी लागेल, असा विश्‍वास पिंपरी-चिंचवडचे महापौर  नितीन काळजे यांनी व्यक्त केला आहे. लवकरच याकरता प्रकल्प सल्लागाराची नेमणूक केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.प्राधिकरणाच्या अडीच एकर जागेवर  महापौर निवास उभारणीचा प्रकल्प गेल्या 25 वर्षांपासून प्रलंबित आहे. जागेवर महापालिकेने महापौर निवासाचा प्रस्ताव बीओटी तत्वावर बनविला होता. जागा  विकसित करण्यासाठी महापालिकेने मान्यताही दिली आहे. याकरता 2001 मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात एका खासगी कंपनीला त्याचे कामही  देण्यात आले. मात्र, प्राधिकरणाची जमीन बीओटी तत्वावर विकसित करता येत नसल्याने, निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. सदर जागा न्यायालयीन प्रक्रियेतून  महापालिकेने ताब्यात घेतली आहे.