0
लातूर, दि. 05, ऑक्टोबर - लातुरमध्ये आता कचरा व्यवस्थापनाठी घंटा गाडी वाढविण्यात आली आणी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करण्यात येत असून  साफसफाईही चालु असल्याचा सुखद अनुभव नागरिकांना येत आहे. शहरात अनेक दिवसांपासून प्रचंड कचरा साठला होता.आता पंतप्रधानांच्या अवाहनानुसार हे शहर  स्वच्छ अणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत. शिवकुमार गवळी यांनी आपल्या प्रभागापासून याची सुरुवात केली. इतर नगरसेवकांनीही याकडं लक्ष द्यावं आणि  नागरिकांनीही घंटागाडी उपक्रमास सहकार्य करावं असं आवाहन उप महापौर देवीदास काळे यांनी केलं. या घंटागाडी यंत्रणेत जुन्या 100 तर नवीन 10 गाड्या रुजू  झाल्या आहेत.

Post a Comment

 
Top