0
सोलापूर, दि. 08, ऑक्टोबर - संतांनी स्वतःचे काम करून अध्यात्म साधले. त्यांनी त्यांचे काम करून अध्यात्माला वाट मोकळी करून दिली. आजच्या काळातही  अध्यात्मासाठी हिमालयाकडे जायची गरज नसल्याचे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. अभिनेत्री स्मिता जयकर लिखित आणि राज्याचे माजी निवडणूक  आयुक्त निला सत्यनारायण यांनी अनुवादित केलेल्या ’आत्ता नाही तर केव्हा’ या पुस्तकाचे प्रकाशन अमृता फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यावेळी त्या  बोलत होत्या. यावेळी स्मिता जयकर, डॉ. मोहन आगाशे, निला सत्यनारायण, अमृता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या, हे  पुस्तक वाचले तर अध्यात्माकडे लवकर वळावे असे वाटायला लागते. देव अध्यात्मातच आहे फक्त ते ओळखता आले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. 

Post a Comment

 
Top