0
मुंबई, दि. 12, ऑक्टोबर -  दिवाळीच्या आधी प्रत्येक दूरसंचार कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर लाँच केल्या आहेत. अशीच एक भन्नाट ऑफर जिओनं देखील आपल्या  प्रीपेड यूजर्ससाठीही आणली  आहे. जिओनं नुकतीच ‘दिवाळी धन धना धन’ ही ऑफर लाँच केली आहे. यामध्ये 399 रुपयांच्या रिचार्जवर 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. म्हणजेच  यूजर्सला हा प्लॅन मोफत मिळणार आहे.
399 रुपयांच्या या रिचार्जमध्ये तीन महिन्यापर्यंत मोफत व्हॉईस कॉलिंग, फ्री डचड आणि सर्व डढऊ कॉलही मोफत मिळणार आहेत. यासोबतच दररोज 1 जीबी डेटाही मिळणार आहे. पण  ही ऑफर मिळवण्यासाठी ग्राहकांकडे फारच कमी वेळ आहे. कारण जिओ दिवाळी धन धना धन ऑफर 12 ते 18 ऑक्टोबरमध्येच घेता येणार आहे. ही ऑफर मिळवण्यासाठी प्रीपेड  ग्राहकांना येत्या 7 दिवसात रिचार्ज करावं लागेल.

Post a Comment

 
Top