Breaking News

नायगावमध्ये रेलरोको; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर वाहतूक सुरु

मुंबई, दि. 07, ऑक्टोबर - तासाभराच्या खोळंब्यानंतर अखेर पश्‍चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली आहे. दोन रेल्वे गाड्या रद्द केल्या म्हणून संतप्त प्रवाशांनी आज नायगाव स्थानकात रेलरोको केले. या रेलरोकोमुळे विरार ते बोरिवली दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली होती. नायगाव रेल्वे आंदोलन पोलिसांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले.
रेल्वे प्रशासनाने कोणतीही सूचना न देता आज सकाळची वसई- अंधेरी लोकल रद्द केली. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी संतप्त प्रवाशांनी रेलरोको करण्याचा निर्णय घेतला. नवीन वेळापत्रकानुसार काही गाड्या वाढवण्यात आल्या होत्या. मात्र त्या रद्द केल्यामुळे सुमारे तासभर प्रवाशांनी लोकल अडवून ठेवल्या.