Breaking News

वरणगावात उद्या एकता मेळावा; अभिनेत्री वर्षा उसगावकर येणार

जळगाव, दि. 12, ऑक्टोबर - भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणावर गुरुवारी सायंकाळी सहा वाजता भारतीय ओडबसम क्रांती व श्री छत्रपती  सेनेतर्फे एकता मेळावा होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे यांनी भीमालयात झालेल्या पत्रकार परीषदेत दिली. सोनवणे यांनी सांगितले की, या मेळाव्यासाठी सिने अ भिनेत्री वर्षा उसगावकर, फॅण्ड्री चित्रपट अभिनेत्री राजेश्री खरात, ज्युनिअर अनिल कपूर, ज्युनिअर ऐश्‍वर्या रॉय, ज्युनिअर सलमान खान आदी कलावंतही उपस्थित राहणार आहेत.