Breaking News

मुखेड तालुक्यात आमदार राठोड यांची सरशी

नांदेड, १० ऑक्टोबर - मुखेड तालुक्यात ग्रमपंचायत निवडणुकीत गावोगावी मतदारांनी भाजपचे आ. राठोड यांच्यावर विश्‍वास दाखवत भाजपच्या उमेदवारांना मोेठे यश दिले आहे. जाहीर झालेल्या 15 ग्राम पंचायतीपैकी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी 11 गावी विजय मिळविला तर कॉग्रेसच्या वाट्याला फक्‍त 4 ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. मराठवाड्याच्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून आले आहे.