Breaking News

विजयाच्या आनंद साजरा करताना येवून धडकली दोन मुलींच्या मृत्यूची खबर

बीड, दि, 12, ऑक्टोबर - सौंदना ग्रामपंचायती सदस्यपदी निवडून आलेल्या वंदना सुंदर साखरे यांच्या दोन मुलींचा स्कुटीचा अपघात होवून त्यांचा निकाला दिवशीच मृत्यू झाल्याची दुर्दे  घटना घडली.या मुळे त्यांच्या विजयाचा आनंद क्षणभंगुर ठरून सारे गाव दुखात बुडाले.आई विजयी झाल्याचे समजल्यानंर 18 वर्षांची
सोनाली सुंदर साखरे आणि 20 वर्षांची दीपाली सुंदर साखरे या दोघी बहिणी सोमवारी दुपारी घरी येत होत्या. केज तालुक्यातील बनसारोळाहून सौंदना गावी जाताना त्यांच्या स्कुटीला ट्रँक्टरने  धडक दिली आणि या मुलींचा जागीच मृत्यू झाला.