Breaking News

पंकज लद्धड अभियांत्रिकी महाविद्यालयात स्त्री भृणहत्या जनजागृतीवर कार्यशाळा

बुलडाणा, दि. 12, सप्टेंबर -  स्थानिक व्हिजन बुलडाणा एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित पंकज लद्धड अभियांत्रिकी महाविद्यालय बुलडाणा येथे राष्ट्रीय सेवा योजना  अंतर्गत स्त्री भृणहत्या जनजगृती एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.  यामध्ये कोयम्बटूर तमिळनाडू येथुनेआलेले लाइफ फॉर ऑल संस्थेचे साथिया सुदान, लायझा व जय  आर यांनी स्त्री भृणहत्तेवर प्रकाश टाकत सागितले की, तरुण वयाचे मुळे मुली कसे पोर्नोग्राफीच्या आहारी जाऊन अनैतिक संबंधाना जन्म देतात त्यातूनच गर्भधारणा झाली की भ्रूनहत्तेचा  मार्ग निवडतात. स्त्री-भृणहत्या याचा मागोवा घेतल्यावर यामागे सामाजिक, धार्मिक, रुढी परंपरा, आर्थिक कारणे आहेत मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मुलगी काय परक्याचे धन,लग्नात द्यावा  लागणारा हुंडा. हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेमुळे गरीब श्रीमंत अशा सगळ्याच स्तरावरचा पालक मुलगीच नको या विचारापयर्ंत आला. परिणामी स्त्री भृणहत्या होते. सामाजिक आरोग्य उत्तम  रहावे यासाठी मुलांची व मुलींची संख्या एकमेकांना पुरक अशी म्हणजे समसमान असावी. पण या वाढत्या स्त्रीभृणहत्येंमुळे हा समतोल ढासाळत चालला आहे. या वेळी सहायक कार्यक्रम  अधिकारी प्रा.कपिल मोरे, प्रा.शुभम अग्रवाल प्रा.वैभव येण्डोले प्रा.मंदार जोशी व रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. बी एम लाहोटी हे उपस्थित होते.