0
मुंबई, १० ऑक्टोबर - हार्बर रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. मात्र गाड्या सुमारे अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत. ऐन सकाळच्या वेळी हा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. 
पनवेल रेल्वे स्थानकानजीक रेल्वे रुळाला तडे गेल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पहाटे ६. २० च्या सुमारास ठाण्याच्या दिशेने जाणा-या लोकलच्या मोटरमनला रेल्वे रुळाला तडे गेल्याचे समजले. मोटरमनने वेळीच लोकल थांबवली आणि याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. यामुळे पनवेल स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

Post a Comment

 
Top