0
नवी मुंबई, दि. 04, ऑक्टोबर - एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलाना वाशी नी ताब्यात घेतले आहे. विनयभंग केल्याची घटना  रविवारी घडली होती. हे तिघेही वाशी स्टेशन परिसरातील झोपडपट्टीतील असून रविवारी याच परिसरात आसपास कुणी नाही हे पाहून या दोघांनी सात वर्षीय मुलीस  पकडून अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न केला मात्र तेवढ्यात तिचा भाऊ येत असल्याचे पाहून या दोन्ही मुलानी तेथून पळ काढला होता. घडल्यानंतर तिच्या आईने  वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केल्यावर सदर कारवाई करण्यात आली आहे.अशी माहिती वाशी पोलिसांनी दिली.

Post a Comment

 
Top