0
स्वीडन, दि. 09, ऑक्टोबर - यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर यांना मिळाला आहे. अर्थशास्त्राचं मानसशास्त्र समजून  सांगणार्‍या थेलर यांचा यंदा नोबेल समितीने पुरस्काराने गौरव केला. 1945 साली जन्मलेल्या रिचर्ड थेलर यांना वयाच्या 72 व्या वर्षी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात  आलं. यंदा अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजनही होते. त्यामुळे या पुरस्काराकडे देशवासियांचं लक्ष लागलं  होतं. दरम्यान, 1998 मध्ये भारताचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार पटकावला होता. आर्थिक समस्या कशा दूर करता येतील, याबाबत  रिचर्ड थेलर यांनी सोप्या भाषेत पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांपैकी एक आहे.

Post a Comment

 
Top