0
नांदेड, दि. 07, ऑक्टोबर - नांदेड महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी न होण्याला काँग्रेससच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. जर ही आघाडी झाली असती तर अधिक चांगले निकाल लागले असते मात्र काँग्रेसने आघाडी होवू दिली नाही असे ते म्हणाले. नांदेड महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अगदी जोरात सुरू असून भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी कॅबिनेट मंत्री संभाजी पाटील निलंगेकर व काँग्रेसच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे ठाण मांडून बसले आहेत. एमआयएम या निवडणुकीत किती मते घेणार आणि त्याचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होतो हा महत्त्वाचा मुद्दा मानला जात आहे. 

Post a Comment

 
Top