Breaking News

डिझेलचोरी प्रकरणी नवी मुंबईत तीन जणांना अटक

नवी मुंबई, दि. 04, ऑक्टोबर - डिझेल चोरी प्रकरणातआणि अवैध शस्त्र बाळगणे या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने आज तीन जणांना अटक केली आहे. 
रमेश सोनार (वय 26 )मनोज राठोड (वय 23) आणि साईप्रसाद राउत (वय 25) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही घणसोली झोपडपट्टीत  राहणारे आहेत. हे आरोपी एमआयडीसी भगत फिरत व ज्या ठिकाणी कमी मान्युष्य वस्ती आहे अशा ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रक चालकास धमकावून त्याच्या  गाडीतील डिझेल काढून घेत. तसेच कधी कधी त्याच्या अपरोक्ष चोरीने डिझेल काढून घेत असत . नंतर तेच डिझेल स्वस्त दरात अन्यत्र विकत होते. अशी माहिती  पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी दिली . खंडणी विरोधी पथकातील पोलिस नाईक सुर्भान जाधव यांना एका खबरीने माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक शिरीष  पवार यांच्या मार्गादार्षाखाली सापळा रचून या तिघांना अटक करण्यात आली आहे. खबरीने दिलेल्या माहिती नुसार महापे ते इंदिरानगर सर्कल येथे सापळा रचण्यात  आला होता. संशयित पंढरी कार आल्या नंतर तिला अडवून झडती घेतली असता गाडीत पाच ड्रम मध्ये 175 लिटर डीझेल आढळून आले. तसेच मनोज राठोड  याच्या कडे देशी कट्टा व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. या तीन जणांना अटक केली आहे.