Breaking News

नोटाबंदीकाळात काळा पैसा पांढरा करणार्‍या कंपन्यांवर प्रहार

नवी दिल्ली, दि. 07, ऑक्टोबर - मोदी सरकारने काळ्या पैशावरुन शेल कंपन्यांना मोठा झटका दिला आहे. नोटाबंदीनंतर रद्द केलेल्या जवळपास 2 लाख कंपन्यांमधून काळा पैसा पांढरा केल्याचं उघड झालं आहे. संशयास्पद व्यवहार करणार्‍या तब्बल 2 लाख 9 हजार 32 कंपन्यांची नोंदणीच रद्द करण्यात आली आहे. सरकारला 13 बँकांमधून संशयास्पद व्यवहारांची माहिती मिळाली होती. त्यावरुन ही कारवाई करण्यात आली.
धक्कादायक म्हणजे ज्या दोन लाखांहून अधिक कंपन्यांची नोंदणी रद्द झाली आहे, त्यापैकी 5 हजार 800 कंपन्यांचे तपशील मिळाले आहेत. या कंपन्यांचे तब्बल 13 हजार 140 बँक खाती असल्याचं उघड झालं आहे. म्हणजे 5 हजार 800 कंपन्यांची जर 13 हजारपेक्षा जास्त खाती असतील, तर दोन लाख कंपन्यांची किती अकाऊंट असतील, याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. नोटाबंदीपूर्वी या कंपन्यांच्या अकाऊंटवर केवळ 22 कोटी होते, मात्र नोटाबंदीनंतर याच कंपन्यांच्या खात्यावर तब्बल 4573.87 कोटी रुपये जमा झाले होते. तर त्याचदरम्यान या खात्यांवरुन 4,552 कोटी रुपये काढले आहेत.