0
औरंगाबाद, दि, 12, ऑक्टोबर - श्रुती भागवत खून प्रकरणात आता तपास करणार्या सीआयडीला आवश्यक असलेले पुरावे औरंगाबादच्या पोलिसांकडून मिळाले नाहीत एवढेच नव्हे तर  औरंगाबाद पोलिसांनी पुरावे सांभाळून ठेवले नाहीत. श्रुती भागवत यांचा मोबाइल डाटाही पोलिसांनी योग्यरित्या हस्तगत केला नाही असे सीआयडीने औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या  अहवालात ठेवला आहे.
औरंगाबाद येथे एकटे राहणार्या श्रुती भागवत हिचा 2012 मध्ये खून झाला होता त्या खुन्याला शोधण्यात पोलिसांना अपयश आल्यानंतर व इतर काही कारणाने तो तपास सीआयडीकडे  देण्यात आला होता सीआयडीने तपास सुरू केला असून त्याला उशीर होण्याची कारणं न्यायालयासमोर सादर केली आहेत.

Post a Comment

 
Top