Breaking News

महास्वच्छता अभियानात आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्वच्छता

औरंगाबाद, दि. 08, ऑक्टोबर - विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येणा-या ‘महास्वच्छता अभियान‘ सकाळी 6 ते 9 या कालावधीत डॉ.बाबासाहेब  आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमात विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी, पदाधिकारी, रासेयोचे स्वयंसेवक, तसेच  विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला. या मोहिमेत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रदीप जब्दे, रासेयो संचालक डॉ.टी.आर.पाटील, डॉ.विलास इप्पर, डॉ.सोनाली क्षीरसागर,  डॉ.निर्मला जाधव, डॉ.आनंद वाघ यांनी सहभाग नोंदविला. यावेळी मा.कुलसचिव डॉ.प्रदीप जब्दे यांनी विद्यापीठातील सर्व विभागातील स्वच्छता मोहिमेची पाहणी  करुन मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागातंर्गत औरंगाबाद शहरातील 42 महाविद्यालयांनी 42 ठिकाणी स्वच्छता केली. या कार्यक्रमाचे महास्वच्छता  अभियानाचे समन्वयक रासेयोचे संचालक डॉ.टी.आर.पाटील यांनी केले. यामध्ये प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, कार्यक्रमाधिकारी, स्वयंसेवक व विद्यार्थी असे एकुण  4250 स्वयंसेवक व 60 कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयातील विद्यार्थी 5500 हजार विद्यार्थी सहभागी झाले.विद्यापीठात 650 स्वयंसेवकांनी विद्यापीठाचा परिसर  स्वच्छ केला. यामध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी शाम बन्सवाल, सुनिल पैठणे, सचिन ढोले, प्रसाद देशमुख, गोपाल तांदळे, शिल्पा  मगर, रेणुका सोळुंके, विठ्ठल नागरे, शरद आजबे, सोनम चव्हण यांचा समावेश होता.