Breaking News

शहराच्या विकासात अधिकारी, कर्मचा-यांचा मोलाचा वाटा - महापौर काळजे

पुणे, दि. 13, ऑक्टोबर - महापालिकेला ग्रामपंचायत ते महापालिका असा 35 वर्षाचा इतिहास आहे. महापालिकेच्या विकासामध्ये स्व.यशवंतराव चव्हाण व अण्णासाहेब मगर यांचा  मोलाचा वाटा आहे. शहराच्या विकासात कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे मोठे योगदान आहे असे, प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिके च्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा, उद्योजकांचा, गुणवंत कामगारांचा तसेच महापालिकेतील गुणवंत अधिकारी व कर्मचारी  यांचा सत्कार करण्यात आला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेल्य कार्यक्रमात आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.  महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास खासदार अमर साबळे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर,  अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य शैलेश मोरे, विलास मडिगेरी, उत्तम केंदळे, आरती चोंधे, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सहआयुक्त दिलीप गावडे, मुख्य लेखाप रिक्षक पद्मश्री तळदेकर आदी उपस्थित होते.आमदार लांडगे म्हणाले, मनपाच्या विकासासाठी महापौर, पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व शहरवासियांनी योगदान दिले पाहिजे.  आपला प्रामाणिकपणा आपल्या कर्तव्यातून दाखवून दिला पाहिजे. पिंपरी-चिंचवड महापालिका कामगारांची नगरी आहे. सर्वांचा समन्वय साधून वातावरण चांगले राहण्यासाठी तसेच  पुढील 30-40 वर्षांचा विचार करुन महापालिकेचा विकास होण्यासाठी पदाधिकारी, नगरसदस्य व अधिकारी यांनी काम केले पाहिजे. शहरातील खेळाडूंना व उल्लेखनीय काम क रणा-यांना न्याय देण्याचे काम महापालिकेने करावे. पिंपरी-चिंचवडची ओळख अण्णासाहेब मगर यांच्यामुळे आशिया खंडात झाली आहे, पुढेही ती अशीच रहावी. यासाठी सर्वांनी  प्रयत्न करावेत, असेही ते यावेळी म्हणाले.सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, अण्णासाहेब मगर यांनी शहराला दिशा दिली, पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी त्यांच्या  स्वप्नातून साकार झाली. आज महापालिकेच्या विकासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत. महापालिका विकासामध्ये आपण योगदान दिले पाहिजे, असे ध्येय सर्वांनी निश्‍चित केले पा हिजे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी काम करावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णा बोदडे यांनी केले. भाऊसाहेब कोकाटे यांनी आभार मानले.