Breaking News

शेवगांव येथील जीवन गौरव पुरस्कार जाहीर

अहमदनगर, दि. 06, ऑक्टोबर - तालुका सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी लढा दिलेले नेतृत्व कॉ. जगन्नाथ कान्होजी काकडे उर्फ आबासाहेब काकडे यांचे 39 वे पुण्यस्मरण व जीवन गौरव पुरस्कार सोहळा सोमवार दि. 9 रोजी सकाळी 11 वाजता येथील आबासाहेब काकडे हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न होत आहे. 
 यावर्षी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या पाच व्यक्तींना हा पुरस्कार निवड समितीने घोषित केलेला आहे.  यामध्ये नाट्यक्षेत्रातील भाऊसाहेब पोटभरे, शिक्षण - तुळशीराम रणमले, वैद्यकीय - डॉ.  सुभाष  बाहेती, योगा -  दिलीप  मोटकर  तसेच संस्थेचे माजी  विद्यार्थी व  आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे प्रमुख बाबासाहेब खराडे यांचा समावेश आहे. पारितोषिकाचे  स्वरुप  सन्मान चिन्ह, मानपत्र, व रोख अकरा हजार रुपये असे आहे. या सर्वांचा गौरव या सोहळ्यात करण्यात येणार आहे.
 या कार्यक्रमासाठी पत्रकार डॉ. बाळ ज. बोठेपाटील, युवा व्याख्याते व लेखक गणेश  शिंदे, आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाचे प्रमुख अ‍ॅड. विद्याधर काकडे, जि.प. सदस्या हर्षदाताई काकडे यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन आबासाहेब काकडे पुण्यस्मरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
पुरस्कार जाहिर झालेल्या पुरस्कार्थीचे त्यांचे मित्र हितचिंतक, ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी  अभिनंदन केले आहे.