Breaking News

जे.डी.आंंबरेे यांना रोटरी जीवन गौरव पुरस्कार

अकोले, दि. 09, ऑक्टोबर - आपल्या शैक्षणिक,सामाजिक,राजकीय व व्यापार क्षेत्रातील योगदानाबद्दल रोटरी क्लब अकोलेच्या वतीने देण्यात येणारा पहिला रोटरी  जीवन गौरव पुरस्कार  अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे.डी.आंबरे पाटील यांना जाहीर झाला आहे.  हा पुरस्कार प्रदान   सोहळा  बुधवारी दिनांक  11  ऑक्टोंबर रोजी सकाळी 11.30 वाजता  रोटरी 3132 चे प्रांतपाल रो.व्यंकटेश चण्णा (सोलापूर)यांच्या शुभहस्ते  अकोले महाविद्यालयाच्या कै. के.बी.दादा  देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष रो.अमोल वैद्य यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणार्‍या रोटरी क्लब ची अकोलेत स्थापना झाल्यानंतर विविध सामाजिक व विधायक उपक्रम क्लब च्या वतीने राबविण्यास सुरुवात  झाली आहे.रोटरी क्लब च्या वतीने देण्यात येणार्‍या पहिल्या रोटरी जीवन गौरव पुरस्कारासाठी जे.डी.आंबरे पाटील यांच्या नावावर नुकत्याच झालेल्या क्लब च्या  बैठकीत सर्वातनुमते शिक्कामोर्तब करण्यात आला.
या कार्यक्रमास  रोटरीच्या उप प्रांतपाल रो.डॉ.बिंदु शिरसाठ  उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन रोटरी क्लबचे सचिव  रो.सचिन आवारी,उपाध्यक्ष रो.तुषार सुरपुरीया,खजिनदार रो.सचिन देशमुख तसेच संचालक मंडळ व रोटरीयन्स यांच्या वतीने करण्यात आले आहे.