Breaking News

सुदर्शन विद्यालयातील पाच संगणक चोरीला; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर, दि. 09, ऑक्टोबर - तालुक्यातील पिचडगाव येथील सुदर्शन विद्यालयातील संगणक कक्षातील खोलीचा दरवाजा तोडून अज्ञात चोरांनी पाच संगणक  चोरून पोबारा केला.संगणक चोरीची ही सलग बारा दिवसा नंतरची ही दुसरी घटना आहे या बाबत नेवासा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.सदरची घटना ही शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत सुदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय कोळेकर यांनी नेवासा पोलीस स्टेशनला या घटनेची खबर दिली त्यात त्यांनी म्हटले आहे या शाळेतील संगणक  चोरीची पहीली घटना दि.25/9/17 रोजी मध्यरात्रीच्या वेळी घडली होती त्यात अज्ञात चोरांनी संगणक कक्षातून एक संगणक यूपीएस सह पळविला होता.याबाबत  पोलीसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता मात्र पोलिसांना याकामी कोणतेच धागेदोरे मिळाले नाही या पहिल्या चोरीच्या घटनेनंतर तब्बल बारा दिवसांनी  चोरांचे मनोधर्य उंचावल्याने पुन्हा अशीच चोरी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास केली व एकूण पाच संगणक संच नेट कनेक्टर चोरून नेले.या प्रकरणी पुढील तपास  पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. पवार हे करीत आहे. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास गोल्हार यांनी गोरगरीब सर्व पालक वर्गाच्या  सहकार्याने सुदर्शन विद्यालय या परिसरात सुरू केले असून परिसरातील एकूण सुमारे अडीचशे गरजू विद्यार्थी शिक्षण घेत असून लोक सहभागातून ही शाळा चालविली  आहे.चोरीस गेलेले सर्व संगणक साहित्य लोक सहभागातून खरेदी केले होते हे सर्व साहित्य चोरीस गेल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून पोलीस  या कामी काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.