Breaking News

गांभिर्य नष्ट करणारे राजकीयष विदूषक

दि. 11, ऑक्टोबर - राजकारणात अथवा समाजकारणात संयमासोबत मानसिक आणि बौध्दीक परिपक्वतेची गरज अनिवार्य आहे.संयम  सुटला तरी एक वेळ मानसिक आणि बौध्दीक क्षमतेच्या जोरावर वेळ मारून नेली जाऊ शकते.या गुणांचा अभाव असेल तर सर्कस किंवा  तमाशातला विनोदवीराची भुमिका बजावण्याशिवाय अन्याय पर्याय उपलब्ध नसतो.अलिकडच्या राजकारणाचा प्रवास या दिशेने सुरू झाला  असल्याची उदाहरणे पहायला मिळत आहेत.या पुर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंञी पदाच्या खुर्चीवर असेच एक विनोदवीर बसले होते.पायउतार  झाल्यानंतर बराच काळ त्यांच्या विनोदी कार्यशैलीची चर्चा महाराष्ट्रात होती.आज  आठवण काढली तशी अधून मधूनही या विनोदवीर  मुख्यमंञ्याची आठवण होते.
त्यांच्या पश्‍च्यात त्यांनी केलेल्या कामांची नव्हे तर विनोद ठरणार्या निर्णयांची आठवण होणे यातच आमच्या म्हणण्याचे मर्म दडलेले  आहे.आजच्या राजकारणातही विशेषतः गेल्या तीन वर्षाच्या राजकारणात काही नवीन विनोद वाचाळवीर निदर्शनास येऊ लागले आहेत.
राजकारण हा करमणूकीचा खेळ नाही.लोकशाहीची मदार राजकारणाच्या प्रगल्भतेवर उभी आहे.राजकारण पोकळ झाले,राजकारणाला उधईने  पोखरले,वाळवीने कुरतडले तर लोकशाहीचा डोलारा कोसळण्यास वेळ लागणार नाही.नेसर्गिक कोप व्हावा आणि क्षणात उसळलेल्या  त्सुनामीने ,अचानक घोंघावलेल्या वादळाने हाहाकार उडवून द्यावा अशी भयानक वाताहत व्हायला वेळ लागणार नाही.राजकारणाचा तमाशा क रणार्या काही मंडळींनी असाच विनोद सुरू केला आहे.यात प्रामुख्याने नारायण राणे ,उध्दव ठाकरे यांची नावे प्राधान्याने घ्यावी लागतील.
नारायण राणे यांना काँग्रेसने दुय्यम महत्व देऊन राजकीय कारकिर्द खिजवली,याचा राग मनात ठेवून त्यांनी काँग्रेसच्या कारभारी मंडळींना  लक्ष्य केले.सुरूवातीला पक्षात राहून आणि नंतर पक्षाबाहेर येऊन.सत्तेत होते तोपर्यंत राणे यांना काँग्रेसची खिजवणारी नीती समजली  नाही.सत्ता गेल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी त्यांना उपरती झाली.आठ दिवस कुठल्याही राजकीय पक्षाचा पदर न धरता तटस्थ राहून  भाजपाकडून काही प्राप्त करता येते का या प्रतिक्षेत असलेल्या राणे यांनी शेवटी स्वतःचा पक्ष निर्माण स्वाभीमान जीवंत असल्याचा दाखला  देऊ केला.सुरूवातीला सहयोगी पक्ष म्हणून राज्य मंञी मंडळात स्थान मिळवण्याची त्यांची इच्छा होती.माञ आता या इच्छेलाही मुरड  घालण्याची वेळ त्यांच्यावर येण्याची शक्यता त्यांच्याच मुख्यपञ पाहील्या नंतर व्यक्त करता येऊ शकते.शिवसेनेचे मुखपञ सामना  प्रमाणे त्यांच्याही मुखपञात भाजप नेत्यांवर केलेला प्रहार या दिवसातला मोठा विनोद मानला जाऊ शकतो.
केंद्र आणि राज्य सरकार विरुद्ध वेगवेगळ्या विरोधी पक्षातील धनंजय मुंडे , काँग्रेस प्रवक्ते आदी नेत्यांनी  केलेल्या टीकेला पहिल्या पानावर
प्राधान्याने स्थान देण्यामागचे महत्त्व आणि हेतूकडे विनोदाने पहायचे की गांभिर्याने? रंगपालट की धमकी ? हा ही विचार होऊ शकतो.
राजकारणातील विनोद क्षेञात नारायण राणे यांच्या तुलनेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे तसे जेष्ठ म्हणायला हवेत.त्यांच्या  विनोदशैलीने ते नेमके सत्तेत आहेत की विरोधी पक्षात याविषयी मातोश्रीवर संभ्रम होतो तिथे माहाराष्ट्राची बाब खूप दुरची.कधी राजीनामे घेऊ न फिरतात तर कधी अमूक तमूक झाले नाही तर सत्ता सोडू ची धमकी.हा स्तंभ लिहीपर्यंत तरी सत्ता सुटली नाही.अन्य हेलकावणार्या मुद्यांवर  असा स्तंभ लिहीतांना स्तंभ लेखक नेहमी काळजीत असतात,या मुद्यावर तशी काळजी नाही स्तंभ लिहून पुर्ण  होईपर्यंतच नाही तर प्रसिध्दी  नंतरही कित्येक महिने सत्ता सुटलेली नसेल.तात्पर्य इतकेच अशा या विनोदी वाचाळवीरांमुळे राजकारणाचे पर्यायाने लोकशाहीचे गांभिर्य नष्ट  झाले आहे.