Breaking News

’केंद्रस्थानी स्त्री : वास्तविकता आणि भवितव्य’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

पुणे, दि. 06, ऑक्टोबर - रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, दृष्टि व स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र आणि दीनदयाळ शोध संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने निर्णय प्रक्रियेच्या  केंद्रस्थानी स्त्री : वास्तविकता आणि भवितव्य या विषयावर 26 व 27 ऑक्टोबरला पुण्यात राष्ट्रीय चर्चासत्र योजण्यात आले आहे.पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या  जन्मशताब्दी निमित्त होणा-या या कार्यक्रमात देशभरातल्या महिला संस्था व संघटनांचे सुमारे 200 प्रतिनिधी व अभ्यासक यात सहभागी होणार आहेत. या  कार्यक्रमात तज्ज्ञ व अभ्यासकांकडून स्त्री केंद्रित कुटुंब व्यवस्था, स्त्री केंद्रित संस्था जीवन, स्त्री केंद्रित समाज जीवन, स्त्री केंद्रित सत्तातंत्र या विषयावर चर्चा घडवून  आणली जाणार आहे. कुटुंबापासून शासन व्यवस्थेपर्यंत, जिथे जिथे स्त्री निर्णय प्रक्रियेचे नायकत्व मिळवत गेली, तिथे तिथे कोणते गुणात्मक बदल झाले व त्या  बदलांमध्ये विविध समाज घटकांची कोणती भूमिका राहिली, याबाबतच्या प्रश्‍नांची चर्चा यात होईल. पुणे येथे पंडित जवाहलाल नेहरु सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम  होणार असून केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे सहकार्य यास मिळणार आहे.