Breaking News

ध्वनीप्रदूषणविरोधात मनपा करणार कारवाई

अहमदनगर, दि. 12, ऑक्टोबर - सध्या सनासुदीचे दिवस आहेत. या कालावधीत शहरात बेकायदेशीर मंडप उभारणी केल्यास तसेच ध्वनीप्रदेशनाचे नियम न पाळल्यास संबंधितांवर महापा लिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.याबाबत नागरीकांनी तक्रार करण्याच आवाहन पालिका प्रशासनाने केले असून तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक एसएमएस, इमेल व संकेतस्थळाची सु विधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 
पुढील आठवड्यात दिवाळी सण असून दिवाळी सणात मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात तसेच शहरात ठिक ठिकाणी अनाधिकृत मंडप उभरुन फटाके विक्रीची दुकाने थाटली  जातात.  यावर महापालिका प्रशासनाचे बारीक लक्ष राहणार असून महापालिका प्रशासनानेही ध्वनी प्रदुषणा बाबत कारवाई करण्याचा आदेश काढला आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल  जनहित याचीका क्रमांक 173/2010 च्या सुनावणी वेळी न्ययालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील विविध उत्सवा प्रसंगी बेकायदा उभारले जाणारे मंडप व ध्वनी प्रदुषणा बाबत  नागरीकांना तक्रार करण्यासाठी तक्रार निवारण प्रणाली प्रस्थापित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. न्यायलयाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने तक्रार निवारण प्रणाली प्रस्तापित  केली असून त्यावर तक्रार करण्याचे आवाहन नागरीकांना करण्यात आले आहे. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 18002331455  तसेच महापालिकेचा इमेल व संकेतस्थळ यासह  9461068333 या मोबाईलवर एसएमएसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
नागरीकांच्या दाखल तक्रारीनुसार संबंधीतांवर महापालिका प्रशासनाकडुन कारवाई करण्यात येणार आहे.
टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवा
शहरात यंदा महानगरपालिकेचे ध्वनी प्रदुषणावर लक्ष राहणार असून, न्यायलयाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने तक्रार निवारण प्रणाली प्रस्तापित केली असून त्यावर तक्रार करण्याचे  आवाहन नागरीकांना करण्यात आले आहे.  त्यासाठी  टोल  फ्री  क्रमांक  18002331455   तसेच महापालिकेचा  इमेल  व  संकेतस्थळ  यासह  9461068333 या मोबाईलवर  एसएमएसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ध्वनीप्रदुषणा विषयी तक्रार करण्यासाठी या क्रमांकाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.