Breaking News

‘डीएमआयसी’ कडे राज्य सरकारचे दुर्लक्ष - पृथ्वीराज चव्हाण

औरंगाबाद, दि. 07, ऑक्टोबर - गेल्या तीन वर्षांत राज्य सरकारने मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ‘डीएमआयसी’कडे दुर्लक्ष केले आहे. अजून एकही उद्योग याठिकाणी सुरू झालेला नाही. मराठवाड्याबद्दल उद्योगक्षेत्रात नकारात्मक मत बनले आहे. राज्य सरकार मराठवाड्याच्या औद्योगिकीकरणाकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. चव्हाण म्हणाले, ‘औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेल्या औरंगाबादचा समावेश ‘डीएमआयसी’मध्ये करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित केली गेली. केंद्रात आमचे सरकार असताना या प्रकल्पाला विशेष गती दिली गेली. आता गेल्या तीन वर्षांपासून या प्रकल्पाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. मी मुख्यमंत्री असताना नागपूरच्या मिहानमध्ये ‘टीसीएस’ आणि इन्फोसिस या कंपन्या आणल्या. भंडारा येथे ‘बीएचईएल’ला मान्यता दिली. अमरावतीमध्ये क्षेपणास्त्र निर्मितीच्या कारखान्याचे भूमीपूजन केले या सरकारन ेआरैगांबादमध्ये मात्र अद्याप काहीच केले नाही.’ दोन वर्षांपूर्वी पाण्याची तीव्र समस्या होता. त्यावेळी लातूरला रेल्वेने पाणी आणले त्यानंतर मराठवाड्याचे वातावरण नकारात्मक झाले आहे. सरकार उद्योगाच्या बाबतीत अजिबात गंभीर नाही. त्यांचे मात्र बुलेट ट्रेन आणि समृद्धी महामार्ग सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. बुलेट ट्रेनचा प्रकल्प कुठेच यशस्वी झाला नाही. प्रभूंचा विरोध होता म्हणून त्यांना रेल्वेमंत्रिपदावरून हटविले, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.