Breaking News

काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवून पोलिसांनी लाठीमार केल्याचा निषेध

नांदेड, १० ऑक्टोबर - विमानतळावर काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवून पोलिसांनी लाठीचार्ज केल्या प्रकरणी निषेध करीत पक्षपाती भूमिका घेणा-या पोलीस अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे येत होते.तेंव्हा स्वागतासाठी गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारत लाठीचार्ज केला. यात नांदेड लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पप्पू कोंडेकर यांच्यासह त्यांचे सहकारी किरकोळ जखमी झाले होते. या बाबत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.