Breaking News

चिमुरडीवर लैंगिक अत्याचार ; सुरक्षारक्षकाला पोलीस कोठडी

मुंबई, दि. 05, ऑक्टोबर - मालाड येथे एका साडेतीन वर्षाच्या मुलीवर अंबोजवाडीत राहणार्‍या सुरक्षारक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.  जयराज सिंग असे सुरक्षारक्षकाचे नाव असून न्यायालयाने आरोपी जयराज सिंगला न्यायालयाने 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिडीत मुलगी याच परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहते. तर जयसिंग देखील मालवणीतील अंबोजवाडी परिसरात राहतो.मुलगी घरासमोर खेळत असताना जयराजने  तिला घरी आणले. घरी आणल्यावर मुलीवर जयसिंगने लैंगिक अत्याचार केले. नंतर मुलीला त्याने हा प्रकार कोणालाही सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली  होती. मात्र हा सर्व प्रकार मुलीने घरी येऊन पालकांना सांगितला. यानंतर पालकांनी मालवणी पोलीस ठाण्यात जयराज विरोधात गुन्हा दाखल केला. मालवणी  पोलिसांनी बलात्कार आणि पोस्को अंतर्गत त्याला अटक केली आहे.