Breaking News

विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची नोव्हेंबरमध्ये घोषणा शक्य

औरंगाबाद, दि. 05, ऑक्टोबर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूक कार्यक्रम नोव्हेंबर महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.  राज्यातील इतर विद्यापीठांचे निवडणूक वेळापत्रक जाहीर झाले आहे. ऑगस्ट अखेरीस निवडणूक होणे बंधनकारक होते, पण तांत्रिक अडर्चीी दाखवत विद्यापीठ  प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम चार महिने लांबणीवर टाकला आहे. ऑगस्ट 2017 पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र, मतदार नोंदणी, अर्ज  छाननी, मतदार याद्यांतील आक्षेप आदी कारणांनी निवडणूक कार्यक्रम तीन महिने लांबणीवर पडला. ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होईल अशी शक्यता कुलगुरू डॉ.  बी. ए. चोपडे यांनी व्यक्त केली होती. ऑक्टोबर महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तरी नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. पहिल्या  टप्प्यात प्राचार्य (दहा जागा), प्राध्यापक (दहा जागा) आणि पदवीधर अधिसभा सदस्य (दहा जागा) अशा 30 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या प्रवर्गात पाच  जागा खुल्या प्रवगार्साठी आणि अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्ग, भटके विमुक्त जाती-जमाती व महिलांसाठी प्रत्येकी एक अशा एकूण दहा जागा आहेत.  जुलै महिन्यात पदवीधर नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली. अर्ज छाननी झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले होते. मात्र,  ऑगस्ट अखेरपर्यंत छाननी झाली नसल्यामुळे निवडणूक वेळापत्रक कोलमडले आहे. हस्तक्षेपामुळे अडथळे दिवाळीच्या सुट्या 15 ऑक्टोबरपासून असल्यामुळे  त्यापूर्वी निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, आता दिवाळीनंतर निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या दिरंगाईचा फटका  निवडणुकीला बसला आहे. प्रत्येक प्रक्रियेत संघटनांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे कामकाज करणे कठीण झाले आहे. या अडचणीत निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची  शक्यता आहे.