Breaking News

गोमांस घेवून जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला

औरंगाबाद, दि. 11, ऑक्टोबर - अजिंठा येथून 1500 किलो गोमांस औरंगाबादला घेऊन जातांना सिल्लोड पोलिसांनी शहरातील भोकरदन  चौकात पकडले आहे. या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली. अजिंठा येथुन मॅक्स पिकअप (एम.एच20 इ 0965) मधून गोमास  विक्रीसाठी जात असल्याच्या माहितीवरुन पोलीस निरीक्षक विश्‍वास पाटील यांनी आपल्या चौकात सापळा लावून जीप गाडी थांबवुन पाहणी  केली. त्यात 1500 किलो गोमांस आढळले ज्याची अंदाजे किंमत 3 लाख असावी. गोमांस व गाडी पोलिसांनी जप्त केली असुन गोमांसाची  तस्करी करणारे अजिंठा येथील मोहम्मद नसीर मोहम्मद नुर वय (34), शेख सोहेल, अब्दुल रहेमान वय (19), शेख अलताफ शेख,  हरुन रिझवान चाँद कुरैशी, अतिक कुरैशी, साबेर साजीद कुरैशी यांना अटक केली आहे.