0
मुंबई, दि. 12, ऑक्टोबर - मुंबईसह राज्यभरातील स्कूल बस असोसिएशन आज काळा दिवस पाळणार आहेत. हरियाणातल्या रायन स्कूलमधील लहान मुलाच्या हत्येनंतर स्कूल बस  चालकांवर अनेक नियम लादले गेले. या मानसिक त्रासाविरोधात स्कूलबस चालकांनी काळा दिवस पाळण्याचा निर्णय घेतल्याचे असोसिएशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. स्कुलबस  चालकांच्या मागण्यांपैकी स्कूल बस चालकांसाठी स्वतंत्र स्वछतागृहाची सोय, शाळा आणि पालकांनी बस चालकांना चांगली वागणूक देणे, शाळेच्या आवारात बससाठी स्वतंत्र पार्किंग जागा  देणे या प्रमुख मागण्या आहेत.

Post a Comment

 
Top