Breaking News

पिंपरीतील भीमसृष्टीच्या कामास गती द्या, महापौर काळजे यांच्या अधिका-यांना सूचना

पुणे, दि. 11, ऑक्टोबर - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात येणा-या  भीमसृष्टीच्या कामकाजास गती देण्यात यावी. भीमसृष्टीचे काम मार्च 2018 पूर्वी पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना महापौर नितीन काळजे  यांनी अधिका-यांना दिल्या आहेत. तसेच भीमसृष्टीमध्ये माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
पिंपरी चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीमसृष्टी उभारणे कामी गठीत केलेल्या समितीच्या बैठकीत ते बोलत होते.  भीमसृष्टी अंतर्गत उभारण्यात येणा-या म्युरल्सचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. महापौर नितीन काळजे यांनी भीमसृष्टी उभारण्यात  येणा-या म्युरल्सला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात माता रमाई यांचा पुतळा उभारण्यास मान्यता दिली. डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी पुतळ्याभोवती पोस्टर, फ्लेक्स, बॅनर्स लावण्यास प्रतिबंध करण्यात येऊन परिसर  संरक्षित करण्यात यावा, असे स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी सागितले.