Breaking News

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यश विकास मोरे पहिला

औरंगाबाद, दि. 07, ऑक्टोबर - फोरम फॉर डिमोक्रेसी एन्ड कम्युनल अमिटी द्वारा आयोजित राज्यस्तरीय निंबध स्पर्धा जातीय सलोख काळाची गरज आणि महत्त्व या विषयावर राज्यस्तरीय निंबध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निंबध स्पर्धेत पैठणाचा यश विकास मोरे या आयकॉन पॅराडाईज ज्यूनिअर कॉलेज पैठणच्या विद्यार्ध्यांनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला. त्याबद्दल त्याचे 5000 रु व पुस्तकाच्या संच देऊन हबीब सादीक साहेब विभागीय संघटक जमाते इस्लामी हिंद् महाराष्ट्र, मोहम्मद हनिफ साहेब अध्यक्ष जमाते इस्लामी हिंद् पैठण, अ‍ॅड. शेख इम्रान साहेब, विशाल बहुउद्देशिय प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य संतोष तांबे साहेब व आयकॉन पॅराडाईज इंग्लिश पैठण, स्कूलचे मुख्याध्यापक आर.बी.रामावत व पालक विकास मोरे, शिक्षक, विद्यार्धी उपस्थित होते.