Breaking News

देशभरातील पेट्रोल विक्रेते एकाच संघटनेखाली एकत्र

रत्नागिरी, दि. 08, ऑक्टोबर - देशातील 54 हजार पेट्रोल विक्रेत्यांचे नेतृत्व करणार्‍या 3 देशव्यापी संघटना युनाइटेड पेट्रोलियम फ्रंट या नावाने एकत्र आल्या  आहेत. फामपेडा या महाराष्ट्रातील संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी रत्नागिरीत ही माहिती दिली.
पेट्रोलियम वस्तूंच्या विक्रेत्यांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. पेट्रोलियम कंपन्यांबरोबर 4.11.2016 रोझी झालेला करार पाळला गेलेला नाही. मार्केटिंग डिसिप्लिन  गाइडलाइनमध्ये प्रमाणाबाहेर अन्यायकारक दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. कबूल केलेले पण न दिलेले डीलर मार्जिन, रोज बदलणार्‍या दरांमुळे  ग्राहक व विक्रेत्यांचे होणारे नुकसान, राज्यानुसार बदलणारे दर स्वस्त व समान होण्यासाठी इंधन जीएसटीमध्ये आणावे, इत्यादी मागण्यांकडे दुर्लक्ष करुन विक्रेत्यांवर  दडपशाही करण्याच्या धोरणाविरुद्ध बेमुदत संपावर जाण्याच्या सर्व सदस्यांच्या तीव्र भावना होत्या. परंतु येणारी दिवाळी लक्षात घेता येत्या 13 ऑक्टोबर रोजी  देशातील 54 हजार पंप खरेदी व विक्री बंद ठेवणार आहेत. तरीही मागण्या मान्य झाल्या नसत्या, तर 27 ऑक्टोबारपासून बेमुदत बंद पाळण्यात येईल, असा इशारा  देण्यात आल्याचे श्री. लोध यांनी स्पष्ट केले.