0
ठाणे, दि. 09, ऑक्टोबर - अतिवृष्टीमुळे पिसे आणि शहाड येथील पंपिंग स्टेशन्सचा विद्युत पुरवठा टोरंटो कंपनीने बंद केल्यामुळे पुढील दोन दिवस संपूर्ण ठाणे  शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. आज सायंकाळी अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे टोरंटो विद्युत कंपनीने पिसे, शहाड  येथील पंपिंग स्टेशनचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याने पुढील दोन दिवस शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य  करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

 
Top