0
औरंगाबाद, १० ऑक्टोबर - आज सोमवारी सकाळी मराठवाडयात वीज पडून मरण पावल्याच्या दोन घटना आजही घडल्या परभणी जिल्हयातील पालम तालुक्यातील तांदुळवाडी येथे नामदेव सोपान जाधव या शेतक-याचा शेतकाम करत असताना अंगावर वीज कोसळून मरण पावला.तर झाल्टा फाटा येथील शेतात 30 वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू, महेरून शेख युसूफ शेख असे महिलेचे नाव आहे.
घोसला (ता. सोयगाव) शिवारात शेताच्या बांधावर वीज कोसळून बैलाचा मृत्यू झाला तर बैलाला सोडण्यासाठी गेलेल्या दोघा शेतकरी बंधूंच्या अंगावर वीज कोसळल्याने दोघेही गंभीर भाजले.
घोसला शिवारात शेतकरी ज्ञानेश्वर नारायण डकले (वय 35), भगवान रामेश्वर डकले (वय 19) हे दोघेही बांधावर बांधलेल्या बैलांना सोडून गाडीला जुंपण्यासाठी गेले असता, काही क्षणांत विजांचा कडकडाट होऊन बैलावर वीज कोसळली. या घटनेत बैल जागीच ठार झाला तर दोघेही शेतकरी वीज कोसळल्याने गंभीररीत्या भाजले. 

Post a Comment

 
Top