0
कोल्हापूर, दि. 13, ऑक्टोबर -  प्रभाग क्रमांक 11, ताराबाई पार्क या प्रभागाच्या पोट निवडणूकीमध्ये ताराराणी आघाडीचे उमेदवार रत्नेश शिरोळकर हे 200 मतांनी विजयी झाले.  या पोटनिवडणूकीमध्ये चार उमेदवार उभे होते. यामध्ये अपक्ष उमेदवार राजेश लाटकर (1199 मते), पवन पांडूरंग माळी (127 मते) व शिवसेना पक्षाचे उमेदवार राज बाबुभाई  जाधव (80 मते). या पोटनिवडणूकीसाठी बुधवार 11 ऑक्टोंबर 2017 रोजी मतदान घेण्यात आले होते. आज सकाळी 10 पासून कै.दिलीपराव देसाई बॅडमिंटन हॉल, सासने मैदान  येथे मतमोजणी करण्यात आली. 
या पोटनिवडणूकीसाठी आबासो सासने विद्यालय व उप-अभियंता लघु बी. ण्ड सी ऑफिस या इमारतीमध्ये प्रत्येकी दोन अशी चार मतदान केंद्रे निश्‍चित करण्यात आली होती. या  निवडणूकीचे कामकाज मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा कुंभार, सहाय्यक निवडणूक  निर्णय अधिकारी गुरु बिराजदार, निवडणूक अधिकारी दिवाकर कारंडे यांनी पाहिले.

Post a Comment

 
Top