Breaking News

महाराष्ट्र सुरक्षित राज्य -सुप्रिया सुळे यांचा विश्‍वास

बीड, दि. 11, ऑक्टोबर - महाराष्ट्र सुरक्षित राज्य आहे,त्यामुळे पोलिसांवर अविश्‍वास दाखवायला नको. कुठलीही सुरक्षा, अंगरक्षक  नसताना मी कुठेही फिरते. मला भीती वाटत नाही, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ‘युवा  जागर संवाद’अंतर्गत त्यांनी मंगळवारी (ता. 10) अंबाजोगाई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पोलीस  यंत्रणेबाबत एक विद्यार्थिनीने उपस्थित केलेल्या प्रश्‍नाबाबत त्या बोलत होत्या. एखादा पोलीस चूक असू शकतो पण त्यामुळे यंत्रणेला दोष  देऊ नका. महाराष्ट्र सुरक्षित राज्य आहे, म्हणूनच मला कुठेही फिरताना भीती वाटत नाही असे त्या म्हणाल्या.