Breaking News

फटाकाबंदीच्या निषेधार्थ मनसेचे फटाके फोडून आंदोलन

अहमदनगर, दि. 12, ऑक्टोबर - फटाके वाजविण्यावर बंदी आणण्याचा राज्य सरकार विचारात आहे. मात्र, या निर्णयास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध दर्शविला आहे. या  पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात तसेच निवासी भागात फटाके विक्री बंदीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने  दिल्लीगेट येथे फटाके  फोडून अनोखे आंदोलन केले.
यावेळी गिरीष जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात नितीन भुतारे, परेश पुरोहित, अभिषेक मोरे, तुषार हिरवे, मयुर घाडगे, गणेश लालबागे, नीलेश खांडरे, मनोज राऊ त, देवा ढगे, मयुर बोंडगे, अशोक दातरंगे, धीरज पोखरणा, इंद्रजित लखारा, अमोल गिते यांच्यासह मनसैनिक सहभागी झाले होते. दिल्लीनंतर महाराष्ट्रातही फटाक्यांवर बंदी येण्याची शक्यता  आहे, त्यास राज ठाकरे यांनी विरोध करत सरसकट फटाके बंदीला विरोध असून हिंदुच्या सणावर आक्षेप का घेतले जातात, असा सवाल केला. त्यानूसार नगरमध्ये मनसेने सरकारच्या  निषेधार्थ दिल्लीगेट येथे निषेध आंदोलन करून फटाके फोडले.