Breaking News

पैठण तालुक्यात वीज पडून एक ठार

औरंगाबाद, दि. 08, ऑक्टोबर - पैठण तालुक्यातील ढाकेफळ येेथे वीज पडून एकजण मरण पावला. ढाकेफळ येथील रामेश्‍वर दशरथ शेरे वय 36 हा येळगंगा  नदीवर गेला असता अचानक ढगाळ वातावरण व वीज कडाडू लागली. तेथे त्याच्या अंगावर वीज पडली आणि तो जागीच ठार झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची  नोंद केली आहे.