0
पुणे, दि. 08, ऑक्टोबर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज (शनिवार) महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आले. चुकीची वीज बिले,  वारंवार वीज बंद, भारनियमन, वीज कार्यालयातील दूरध्वनी बंद तसेच उचलला जात नाही यासारख्या अनेक प्रश्‍नांवर हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात विरोधी  पक्षनेते चेतन तुपे ,माजी महापौर प्रशांत जगताप, शहर उपाध्यक्ष अशोक राठी, अल्पसंख्याक अध्यक्ष इक्बाल शेख, युवक अध्यक्ष राकेश कामठे, हसीना इनामदार,  संजय लोणकर, राहुल लोणकर, उपस्थित होते. नगरसेवक अनिस सुंडके, हाजी फिरोज, गफूर पठाण, हमिदा सुंडके, परवीन फिरोज, रईस सुंडके यांच्या  नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले .

Post a Comment

 
Top