Breaking News

काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कामे केल्याने उपनगराच्या विकासाला चालना - आ. जगताप

अहमदनगर, दि. 11, ऑक्टोबर -  काँग्रेस राष्ट्रवादीचे नगरसेवक सेवाभावी वृत्तीने काम करतात. उपनगरामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या  नगरसेवकांनी काम केल्यामुळे उपनगराच्या विकासाला चालना मिळाली. माणसे जोडल्याचे काम केल्याने समाजामध्ये एकोपा निर्माण होतो.  नगरसेविका रूपाली वारे यांनी विकासकामात पाठपुरावा केल्यामुळे प्रभाग 2मध्ये अनेक विकासकामे मार्गी लागली. नागरिकांना विश्‍वासात  घेऊन कामे केल्यास दर्जेदार व टिकाऊ कामे होतात, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
प्रभाग 2 च्या नगरसेविका रूपाली वारे यांच्या प्रयत्नातून राधेश्याम कॉलनी व साफल्य अर्बन कॉलनी येथे बंद पाईप गटारीच्या कामाचा  शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी गटनेते संपत बारस्कर, निखील वारे, कुमारसिंह  वाकळे, अजिंक्य बोरकर, योगेश ठुबे, बाळासाहेब पवार, कविता पाटील, संदीप यादव, प्रणोती शेलार, अभिजीत जोशी, शोभना लगड, मकरंद  जामदार, सविता मोरे, जो. आढाव, सारिका भोसले, शैला गाडेकर, विजया यादव, कुसूम पालवे, मर्जिना शेख, प्रतिभा चौधरी, वसीर पठाण,  सविता आलेकर, नाजिया शेख, पद्मा गायकवाड, अनिता गर्जे आदी उपस्थित होते.