Breaking News

शिवसृष्टीला विरोध करणार्‍या शंकर केमसेंना काळे फासणार - संभाजी ब्रिगेड

पुणे, दि. 06, ऑक्टोबर - शिवसृष्टी उभारावी परंतु ती पुतळ्यांची, दगड मातीची शिवसृष्टी नसावी. तर त्या जागेत हॉस्पिटल, गेम पार्क, लॅब्ररी आणि शिवाजी  महाराजांचा पुतळा असावा जेणे करून शिवाजी महाराजांचे विचार पुढे जातील, असे मत व्यक्त करणारे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि माजी सभागृह नेते शंकर  केमसे यांना काळे फासणार, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला. संभाजी ब्रिगेडच्या वतीने जारी केलेल्या ध्ये शंकर केमसे यांचा खरपूस  समाचार घेताना शिवसृष्टीला विरोध करणे हा शंकर केमसेंचा करंटेपणा असल्याचे म्हटले आहे. पुणे महापालिकेत सभागृह नेते पदावर असताना टक्केवारीवर जगणारे  शंकर केमसे कोथरूड येथील ’शिवसृष्टी’ प्रकरणात सत्तेवर असताना ’मूग गिळून’ बसले होते. ज्या विषयात टक्केवारी मिळेल त्याच विषयात ’रस’ दाखवणार्‍या  केमसेंचा हा करंटेपणा आहे. दुकानदारी बंद पडली म्हणून प्रसिद्धीसाठी ’शिवसृष्टी’ला विरोध म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य कर्तृत्वाला विरोध होय...!  केमसे यांनी सभागृह नेते असताना कोणत्या हॉस्पिटलचा विषय मार्गी लावला हे त्यांनी स्पष्ट करावे.