Breaking News

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर चित्रपट

सोलापूर, दि. 13, ऑक्टोबर - सरकारी वकील बनून अनेकांना न्याय मिळवून देणारे वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो. मात्र त्यांच्या वैयक्तिक जीवनात  नेमके काय घडले ते रूपेरी पडद्यावर चितारण्याचे काम सोलापूरच्या सुवदन आंग्रे यांनी केले आहे.ही माहिती आंग्रे यांनीच पत्रकार परिषदेत दिली. चित्रपटात सुवदन आंग्रे, मुकेश  तिवारी, अनंत जोग, अशोक शिंदे, योगेश वणवे, मिथिला नाईक यांनी भूमिका केल्या आहेत. पत्रकार परिषदेस नाट्य लेखक मोहन आंग्रे, विशाल माने उपस्थित होते.
6 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला पॉवर ऑफ लॉ चित्रपट श्री अंबिका माता प्रॉडक्शन निर्मित आहे. जो कायद्यात राहतो तोच फायद्यात राहतो, असा अर्थ सुवदन  आंग्रे यांनी या चित्रपटाचा असल्याचे सांगितले.
निर्माता योगेश वणवे असून, सहनिर्माता, कथा, दिग्दर्शन सुवदन आंग्रे यांचे आहे. संवाद -गणेश महिंद्रकर, छायाचित्रण -दिलीपकुमार डोंगरे, संगीत -श्रीरंग आरस, गीतकार - स चिन निकम, गायक -मिलिंद इंगळे, वैशाली सामंत, कविता राजहंस, लाइन प्रोड्यूसर - दिनेश पुजारी यांनी काम पाहिले.