0
नवी दिल्ली, दि. 12, ऑक्टोबर - टीम इंडियाचा सर्वात अनुभवी गोलंदाज आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. होमग्राऊंड असलेल्या फिरोज शाह कोटला  मैदानावर 1 नोव्हेंबर रोजी होणार्‍या टी-20 सामन्यानंतर तो निवृत्ती जाहीर करणार आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांना या निर्णयाबाबत आशिष नेहराने माहिती दिली आहे. आयसीसी 2018 मध्ये टी- 20 विश्‍वचषकाचं आयोजन करणार नाही. त्यामुळे चांगली कामगिरी करत असलेल्या युवा खेळाडूंना संधी देणं जास्त योग्य राहिल, असं नेहराने म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20  मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध तीन वन डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. यातील टी-20 सामना 1 नोव्हेंबरला दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात होणार आहे.  हेच मैदान नेहराचं होमग्राऊंडही आहे.

Post a Comment

 
Top