0
मुंबई, दि. 08, ऑक्टोबर - विक्रोळीतील टागोरनगरमध्ये म्हाडाची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केल्यामुळे ’न्यू पंजाबी तडका’ या हॉटेलवर म्हाडाने  कारवाई केली आहे.विक्रोळी टागोरनगरमधील 412 आणि 54 या इमारतीच्या मोकळ्या जागेमध्ये न्यू पंजाबी तडका हे हॉटेल चालवले जात होते. या हॉटेलच्या  अनधिकृत बांधकामांवर म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीने कारवाई करण्यात आली.म्हाडाच्या मोकळ्या भूखंडावर हॉटेलचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते.  परंतु, 2013 मध्ये याबाबत न्यायालयाने स्थगिती आदेश दिल्यामुळे यावर कारवाई करता येत नव्हती. मात्र न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर म्हाडाच्या मुंबई  मंडळाच्या अधिकार्‍यांनी कारवाई केली. 

Post a Comment

 
Top