0
मुंबई, दि. 11, ऑक्टोबर - कीटकनाशकावर ‘चायनीज गन’च्या सहाय्याने फवारणी केल्यांमुळेच विदर्भात शेतक-यांचे मृत्यू झाले  असल्याचे आढळून आल्याने या गनच्या वापरावर बंदी घालण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे जाहीर केले. याप्रक रणी संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल,अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. 
मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. विदर्भाच्या शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधीत दोषी कंपन्यांवर  तसेच विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. शेतक-यांना प्रोटेक्टिव्ह मास्क देण्याचाही सरकारने निर्णय  घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यात अलिकडेच कापसावर कीटकनाशकाची फवारणी करताना वीसपेक्षा अधिक शेतक -यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Post a Comment

 
Top