Breaking News

केज तालुक्यात गोव्यातील दारूचा साठा जप्त

बीड, दि. 07, ऑक्टोबर - फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असणार्या दारूचा बेकायदेशीर साठा केज तालुक्यातील होळ शिवारात सापडला असून या दारूची बेकायदेशीर साठवणूक करणार्यांना अटक करून 8 लाख 84 हजारांची दारू जप्त करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्‍वभूमिवर शुक्रवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास होळ येथील एका मळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये असलेली ही दारू उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून जप्त केली. साठयाजवळ बसलेल्या संजय सखाराम केंद्रे यास अटक केली आहे.